मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मराठा आरक्षणासंदर्भात दिल्लीत भेट घेणार आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा आरक्षणावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. या बैठकीतून मराठा आरक्षणावर तोडगा नक्कीच निघेल, असा विश्वास संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.
मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात मोर्चे निघत आहेत. आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे त्यावर गंभीरपणे विचार करत आहेत. मराठा आरक्षणावर काळजीपूर्वक काम करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे हे आज मोदींना भेटत आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आहेत. या भेटीतून मराठा आरक्षणावर तोडगा निघेल, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
दुसरी लाट ओळखताना उशीर झाला, पण तिसरी लाट येऊ द्यायची नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पंतप्रधानांनी अतिशहाण्या मुख्यमंत्र्यांना लायकी दाखवली; अतुल भातखळकर यांची नाव न घेता टीका
“मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेणार भेट”
21 जूनपासून 18 वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण करणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी