मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होण्याची भीती असून यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आशा सेविकांसोबत संवाद साधला. यावेळी तज्ञ डॉक्टरही उपस्थित होते.
कोरोनाचं संकट अजूनही गेलेलं नाही. संकट टळलेलं नसलं तरी ते नियंत्रणात आणू शकतो असं चित्र निर्माण झालं आहे. राज्यात जे काम आपण करत आहोत त्याची आश्चर्यकारकरित्या देशात आणि परदेशात प्रशंसा होत आहे. कौतुक होत असताना महाराष्ट्र आणि मुख्यमंत्री यांचं कौतुक होतं. पण मी काहीच केलेलं नाही मी फक्त निमित्तमात्र असून कर्ते करवते तुम्ही आहात, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ‘आशा’ शब्दाला साजेसं काम आपण करत आहात असं म्हणत त्यांचं कौतुक केलं.
तुमच्या आशा, अपेक्षांकडे लक्ष देणार तितक्यात कोविड संकट आलं. पण तुम्हाला विसरलो आहोत असं समजू नका. आपले ऋण विसणार नाही. परतफेड करणं शक्य नसलं तरी तुमच्या वेदनांची दखल घेतली आहे. त्यावर मी नक्कीच मार्ग काढणार असून त्यासाठी थोडा अवधी लागेल. सरकारला थोडी मुभा द्या, अशी विनंती उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.
मुलांमधील कोविड संसर्ग: आशा सेविकांची जबाबदारी | COVID in Children Responsibility of ASHA Workers https://t.co/QTq61M5Qka
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 7, 2021
दरम्यान, दुसरी लाट ओळखायला उशीर केला आणि संकट आलं. मात्र तिसरी लाट येऊ द्यायची नाही, असा निर्धार उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
पंतप्रधानांनी अतिशहाण्या मुख्यमंत्र्यांना लायकी दाखवली; अतुल भातखळकर यांची नाव न घेता टीका
“मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेणार भेट”
21 जूनपासून 18 वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण करणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी
नाथाभाऊंनी तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं- चंद्रकांत पाटील