Home महाराष्ट्र “मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेणार भेट”

“मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेणार भेट”

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. गृहमंत्री दिलीप वळस पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ उद्या दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहे. यावेळी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि तौते चक्रीवादळ मदतीसंदर्भात चर्चा केली जाईल. , असं दिलीप वळसे पाटील म्हणाले.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यापासून राज्यातील वातावरण तापलं आहे. तसेच ओबीसींच्या राजकीय आरक्षणालाही सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने त्यामुळे त्याचे तीव्र प्रतिसाद उमटत आहेत. या दोन्ही मुद्द्यांवरून विरोधकांकडून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

21 जूनपासून 18 वर्षांवरील सर्वांचं मोफत लसीकरण करणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नाथाभाऊंनी तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं- चंद्रकांत पाटील

…तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा- निलेश राणे

सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस अस्वस्थ, सरकार स्थापन करायला तळमळताहेत- एकनाथ खडसे