मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाकडून झालेल्या टीकेला उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उत्तर दिलं होतं. याला आता माजी खासदार निलेश राणे यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय.
“अजित पवार वाटेल तसं बडबडत असतात, त्यात काही नवीन नाही. पण मराठा समाजासाठी काही जण आवाज उठवत आहेत, त्यांचा आवाका मोजण्याचं धाडस अजित पवारांनी करू नये. मराठ्यांचा अपमान करू नका. पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं, तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा, असं टोला निलेश राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून टीका करतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांना टोला लगावला होता. त्यानंतर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं होतं. अजित पवारांनी केलेल्या टीकेला माजी खासदार निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
अजित पवार वाटेल तसं बडबडत असतात त्यात काही नवीन नाही. पण मराठा समाजासाठी काही जण आवाज उठवत आहेत त्यांचा आवाका मोजण्याचं धाडस अजित पवारांनी करू नये. मराठ्यांचा अपमान करू नका, पहाटेच्या शपथविधीनंतर पवार साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 7, 2021
महत्वाच्या घडामोडी –
सत्ता गेल्यापासून देवेंद्र फडणवीस अस्वस्थ, सरकार स्थापन करायला तळमळताहेत- एकनाथ खडसे
नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोलल की लोकं चंपा म्हणतात- अमोल मिटकरी
… तर मुंबईत चित्रीकरणासाठी परवानगी देणार- उद्धव ठाकरे
“पवारांच्या ड्रॉव्हरमधून आमदारांची यादी चोरून राज्यपालांना सादर करणे कोणत्या नैतिकतेत बसते?”