पुणे : राष्ट्रवादीच्या 54 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांना सादर करण्याचा विषय 14 महिने जुना आहे, हा विषय आता का काढता? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला होता. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्र झोपेत असताना एक दिवस राज्यातील सरकार पडेल, असे आपण म्हटल्यावर अजित पवार यांनी काही बोलण्याची आवश्यकता नव्हती. कारण मी काही त्यांना उद्देशून बोललो नव्हतो. परंतु, त्यांनी त्यावर आपली चेष्टा करण्याचा प्रयत्न केला. आता तुम्ही बोलला तर मला बोलावे लागणार. कारण वाराला प्रतिवार करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हे आपल्याला शिकवले आहे, असा टोमणा चंद्रकांत पाटलांनी यावेळी लगावला.
दरम्यान, 14 महिने झाले तरी जे चुकीचे ते चुकीचेच असते. शरद पवारांच्या ड्रॉव्हरमधून 54 आमदारांची यादी चोरून राज्यपालांना सादर करणे कोणत्या नैतिकतेत बसते? तरीही ते शहाणपणा शिकवतात?, असा प्रश्नही चंद्रकांत पाटलांनी यावेळी उपस्थित केला. ते माध्यमांशी बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी बाळासाहेब ठाकरेंचे विचारच गाडून टाकले- निलेश राणे
खाकीवर डाग असणाऱ्या विकृतांना तात्काळ धडा शिकवा- चित्रा वाघ
काही चुकलं असेल तर दिलगिर आहे, दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही; संभाजीराजे रायगडावरून कडाडले
“विनापरवानगी मोर्चा काढल्याबद्दल विनायक मेटे आणि नरेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल”