मुंबई : महाराष्ट्रात लहान मुली, महिलांसोबतचं पोलीस दलात काम करणाऱ्या महिला पोलीसही लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरत आहेत. ही गंभीर आणि चिंतेची बाब आहे. त्यामुळे या प्रकरणात स्वत: लक्ष घालून खाकीवर डाग असणाऱ्या विकृतांना तात्काळ धडा शिकवा, असं आवाहन भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलं आहे.
चित्रा वाघ यांनी आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं. यावेळी त्यांनी राज्यातील वाढत्या महिला अत्याचारावर वळसे-पाटलांशी चर्चा करून त्यांना या प्रकरणात लक्ष घालण्याचं आवाहन केलं.
राज्यात मुली आणि महिलांवर अत्याचार होत असतानाच आता पोलीस दलातील महिलाही अत्याचाराच्या बळी पडत आहेत. लैंगिक अत्याचार पीडितांना आपली व्यथा मोकळेपणाने मांडता यावी म्हणून तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी पोलीस दलात महिलांचा समावेश केला. त्यांचा हा निर्णय कितपत यशस्वी झाला आहे?, असा सवालही वाघ यांनी निवेदनात केला आहे.
दरम्यान, पोलीस दलातील महिलाच आज पोलीस दलातील पुरुष सहकाऱ्यांच्या अत्याचाराच्या बळी पडत आहेत. पुरोगामी महाराष्ट्रासाठी ही गोष्ट शोभनीय नाही. ही अत्यंत शरमेची बाब आहे. राज्यातील आयाबहिणींचं संरक्षण करणाऱ्या पोलिसांचा आम्हाला अभिमान आहेच. पण पोलीस दलात काही विकृत पोलीस असून ते आपल्या महिल्या सहकाऱ्यांवरच अत्याचार करत आहे. या घटनांचा आलेख वाढत असून हे चित्रं भयावह आणि चिंताजनक आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
महाराष्ट्रात लहान मुली महिलांसोबतचं पोलिसदलात काम करणार्या महिला पोलिस ही लैंगिक अत्याचाराच्या बळी ठरताहेत जो अतिशय गंभीर व चिंतेचा विषय आहे
या संदर्भात @maharashtra_hmo चीं भेट घेत चर्चा करत निवेदन दिले
रक्षणकर्त्यांच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्याचं काय हा प्रश्न उपस्थित होतो pic.twitter.com/Et9JTqCnRf— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) June 6, 2021
महत्वाच्या घडामोडी –
काही चुकलं असेल तर दिलगिर आहे, दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही; संभाजीराजे रायगडावरून कडाडले
“विनापरवानगी मोर्चा काढल्याबद्दल विनायक मेटे आणि नरेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल”
शिवराज्याभिषेक हा महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला सुवर्ण क्षण- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
रायगडाच्या दरबारात आपण उभे राहतो तेव्हा एक सकारात्मक ऊर्जेची भावना मनात येते- जयंत पाटील