मुंबई : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज साजरा होत असलेल्या शिवराज्याभिषेक सोहळ्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या.
रायगडाच्या मध्यभागी असलेल्या दरबारात आपण उभे राहतो तेव्हा एक सकारात्मक ऊर्जेची भावना मनात येते. शिवरायांच्या राज्याभिषेकाची माहिती गाईड सांगत असताना अवघा राज्याभिषेक सोहळाच नजरेसमोर उभा राहिला होता. उत्सुकतेपोटी ते सर्व ऐकताना अंगावर तेव्हाही काटा आला होता आणि आजही लिहितानाही येतो आहे, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना असून खऱ्या अर्थाने ती स्वराज्याची सुरुवात होती. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा येणाऱ्या हजारो वर्षे संपूर्ण भारतीयांसाठी प्रेरणादायी असाच गौरवपूर्ण क्षण आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना आहे. खऱ्या अर्थाने ती स्वराज्याची सुरुवात होती. त्यामुळे महाराजांचा राज्याभिषेक येणाऱ्या हजारो वर्षे संपूर्ण भारतीयांसाठी गौरवपूर्ण क्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक दिनी विनम्र अभिवादन. pic.twitter.com/i1cvBHy2j0
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) June 6, 2021
महत्वाच्या घडामोडी –
भाजपला श्रेय नको म्हणूनच महाविकास आघाडी सरकारनं मराठा आरक्षण रद्द केलं- प्रवीण दरेकर
“अशोक चव्हाण यांचा राजीनामा मराठा समाज मागेल, भाजप मागणार नाही”
“राऊत साहेब, आपण सरकार आहोत की, फक्त शिवसेना हे तरी एकदा ठरवा”
“अजित पवारांना झोपेत सरकार कशी करतात ते माहिती, पण ते टिकवता येत नाही”