Home महाराष्ट्र भाजपला श्रेय नको म्हणूनच महाविकास आघाडी सरकारनं मराठा आरक्षण रद्द केलं- प्रवीण...

भाजपला श्रेय नको म्हणूनच महाविकास आघाडी सरकारनं मराठा आरक्षण रद्द केलं- प्रवीण दरेकर

मुंबई :  महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात आपली भूमिका मांडण्यात कमी पडलं, त्यामुळेच मराठा आरक्षण रद्द झाल्याचा आरोप भाजप नेते सातत्याने करत आहेत. आता विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मराठा आरक्षणावरुन पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या काळात राज्य सरकारने मराठा समाजाच्या हितासाठी आरक्षण लागू केले. मात्र कुठेतरी राजकीयदृष्ट्या मराठा समाज भाजपच्या मागे जाईल अशी भीती महाविकास आघाडीला वाटली. त्यातूनच चुकीच्या पद्धतीचा आरक्षणाचा प्रस्ताव ठेवला असल्याचे सांगत हे आरक्षण रद्द करण्यास ठाकरे सरकारने भाग पाडले, असं प्रवीण दरेकर म्हणाले.

दरम्यान, आता मराठा समाज पेटून उठला आहे. त्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी खांद्याला खांदा लावून आंदोलनात सहभागी होणार, असंही प्रवीण दरेकरांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“अशोक चव्हाण यांचा राजीनामा मराठा समाज मागेल, भाजप मागणार नाही”

“राऊत साहेब, आपण सरकार आहोत की, फक्त शिवसेना हे तरी एकदा ठरवा”

“अजित पवारांना झोपेत सरकार कशी करतात ते माहिती, पण ते टिकवता येत नाही”

शिवसेना-भाजप युती पुन्हा होणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात…