मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केलीं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
अशोक चव्हाण समाजाला न्याय देऊ शकत नाही, अशी भावना मराठा समाजात निर्माण झाली असेल तर ते त्यांचा राजीनामा मागतील. मी व्यक्तिश: किंवा भाजप अशोक चव्हाणांच्या राजीनाम्याची मागणी करणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
दरम्यान, हे सगळे कामकाज त्यांनी नीट सतर्कतेने पाहावे हेच आमचे म्हणणे आहे, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“राऊत साहेब, आपण सरकार आहोत की, फक्त शिवसेना हे तरी एकदा ठरवा”
“अजित पवारांना झोपेत सरकार कशी करतात ते माहिती, पण ते टिकवता येत नाही”
शिवसेना-भाजप युती पुन्हा होणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात…
“सह्याद्री अतिथीगृहाच्या स्लॅबप्रमाणे सरकार कधी कोसळेल हे कळणार नाही”