Home महाराष्ट्र “राऊत साहेब, आपण सरकार आहोत की, फक्त शिवसेना हे तरी एकदा ठरवा”

“राऊत साहेब, आपण सरकार आहोत की, फक्त शिवसेना हे तरी एकदा ठरवा”

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट रिट्विट केलं होतं. त्यावरुन भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय.

संजय राऊतजी, असत्याचे ओझे तुम्हालाही डोईजड झाले आहे ना? आधी पत्रकारांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देण्याच्या तुमच्या मतास ठाकरे सरकारने पाने पुसली. आता शिवसेनेचा मराठी बाणा खुंटीवर टांगला. राऊत साहेब, आपण सरकार आहोत की, फक्त शिवसेना हे तरी एकदा ठरवा, असं केशव उपाध्ये म्हणाले आहेत.

दरम्यान, तसंही, पत्रकार की खासदार या संभ्रमातच तुम्ही अडकलेले आहात. त्यात आता नवी भर. मराठीला वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या ठाकरे सरकारला रोखठोक सवाल करायला पत्रकाराचा बाणा लागतो. तुमच्या भावना प्रशांत कदम यांनी मांडल्या म्हणून रिट्विट केलं ना?,” असं म्हणत उपाध्ये यांनी राऊतांवर टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“अजित पवारांना झोपेत सरकार कशी करतात ते माहिती, पण ते टिकवता येत नाही”

शिवसेना-भाजप युती पुन्हा होणार?; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात…

“सह्याद्री अतिथीगृहाच्या स्लॅबप्रमाणे सरकार कधी कोसळेल हे कळणार नाही”

कितीही हजारांचा पोलिस बंदोबस्त असू दे, मोर्चा निघणारच- विनायक मेटे