रायगड : राज्यात अनलॉकसंबंधी झालेल्या गोंधळावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. ते रायगडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
अनलॉकबाबत पूर्णपणे सुसंवाद आहे. ज्या दिवशी करोना आला तेव्हापासून राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून लोकांसमोर येतात. त्यानंतर मग अनेकदा राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपे भूमिका मांडत असतात. विजय वडेट्टीवार यांनी एक शब्द राहून गेला होता त्यामुळे गैरसमज झाला होता असं स्पष्ट केलं आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.
दरम्यान, शेवटी सरकार कोणाचंही असलं तरी राज्याचे मुख्यमंत्री सांगतील तो अंतिम निर्णय असतो, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्यांना शिस्त लावली पाहिजे- देवेंद्र फडणवीस
छत्रपती घराण्याचं काम लोकांना पेटवण्याचं नाही, तर न्याय देण्याचं- संभाजीराजे छत्रपती
मी 39 वर्षे शिवसेनेत होतो, मराठा आरक्षणाबद्दल शिवसेनेची काय भूमिका आहे, हे मला माहितीये- नारायण राणे
…तर 2024 मध्ये काँग्रेस स्वबळावर सत्तेत येईल- नाना पटोले