पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या बैठकीत सीबीएसई बोर्डाच्या 12 वी इयत्तेच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरुन राज्याचे उच्च व तत्रंशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
“आम्ही अंतिमवर्षाच्या परीक्षा रद्द केल्या तेव्हा जोरदार विरोध… आता केंद्र सरकारने 12 वी CBSE परीक्षा रद्द केल्या तर स्वागत… असो केंद्र सरकारने 12वी CBSE विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करून परीक्षा रद्द केल्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो… जय महाराष्ट्र!,” असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, करोना परिस्थितीचा आढाव घेत राज्य सरकारने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर भाजपाने कडाडून टीका केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला फटकारल्यानंतरही भाजपाच्या अनेक नेत्यांनी ठाकरे सरकारच्या न परीक्षा घेण्याचा धोरणांवर टीका केली होतीं.
महत्वाच्या घडामोडी –
राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांची सहमती; म्हणाले…
एकनाथ खडसे, उदय सामंत शरद पवारांच्या भेटीला; उदय सामंत यांनी दिलं भेटीबाबत स्पष्टीकरण
खासदार उदयनराजे भोसले मराठा आरक्षण आंदोलनात पुढाकार घेण्यास तयार; हर्षवर्धन पाटलांनी दिली माहिती
चंद्रकांतदादांचा तोल ढासळला आहे, त्यांना उपचाराची गरज; संजय राऊतांचा टोला