पुणे : पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्यासह 60 जणांविरोधीत कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आमदार लांडगे यांच्यासह एकूण 60 जणांवर भोसरी पोलीस ठाण्यात कोरोना नियमांची पायमल्ली केल्याने 188, 269 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) सह 135 नुसार जमावबंदीचे उल्लंघण याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आमदार लांडगे यांच्या मुलीचा 6 जून रोजी विवाह सोहळा असून, त्यापूर्वी काल झालेल्या मांडव सोहळ्यात त्यांनी कार्यकर्त्यांसह भंडारा उधळून डान्स केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावेळी उपस्थित असलेल्या अनेकांनी मास्क देखील लावला नव्हता. कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या व्यक्तींनी सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाकडे दुर्लक्ष करत, गर्दी करत जल्लोष केला होता.
महत्वाच्या घडामोडी –
सरकार माझ्यावर पाळत ठेवतंय; संभाजीराजे यांचा खळबळजनक आरोप!
सरकारची OBC आरक्षणाची मानसिकता नाहीच, आम्ही निवडणुका होऊ देणार नाही- पंकजा मुंडे
“फडणवीस खोटारडे, भाजपनेच ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला; आता चोराच्या उलट्या बोंबा”
मोठी बातमी! मराठा समाजाला 10 टक्के EWS आरक्षण; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय