Home महाराष्ट्र ..तर शरद पवार यांच्यावर पीएचडी करण्याचा विचार करावा- रुपाली चाकणकर

..तर शरद पवार यांच्यावर पीएचडी करण्याचा विचार करावा- रुपाली चाकणकर

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पीएचडी करण्याची इच्छा असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रत्यृत्तर दिलं आहे.

चंद्रकांत पाटील आपण शरद पवार यांच्यावर शिवाजी विद्यापीठातून  पीएचडी करणार आहात. उत्तम मानस आहे तुमचा, पण आधी त्यासाठी तुम्ही पोस्ट ग्रेजुएट व्हावं. पास झालं तर ठीक नंतर पीएचडी पात्रतेचा विचार करावा, असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गेली 50 वर्ष राजकारणात आहेत. पण तरीही त्यांचा पक्ष 10 पेक्षा जास्त खासदार पाहू शकला नाही. मात्र तरीही ते राजकारणात कायम केंद्रस्थानी असतात. त्यामुळे मला त्यांच्यावर पीएचडी करण्याची इच्छा असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या घडामोडी-

” राष्ट्रपुरुषांना अपमानित करणाऱ्या काँग्रेसबद्दल उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी”

दादा खेळत रहा, वेळ चांगला जाईल; शिवसेनेचा चंद्रकांत पाटलांना टोला

“आपमतलब्यां’चा पराभव झाला, केजरीवालांच्या झाडूने सगळयांना साफ केलं”

आपण यावर विचार करणार आहोत की हा दिवसही इतर दिवसांप्रमाणेच असणार?, सत्यजीत तांबेंचा काँग्रेसला सवाल