मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी रात्री राज्यातील जनतेशी संवाद साधताना लॉकडाउन 15 दिवसांसाठी वाढत असल्याची घोषणा केली. याच पार्श्वभूमीवरुन विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय.
महाराष्ट्रातील 12 कोटी नागरिकांच्या लसीकरणासाठी असलेला चेक वठणार कधी? हे मुख्यमंत्री महोदयांनी स्पष्ट करणे अपेक्षित असताना, 15 दिवसांसाठी लॉकडाऊन वाढविण्यापलिकडे मुख्यमंत्र्यांच्या संवादात काहीही नव्हतं, असं म्हणत प्रवीण दरेकरांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
जसं माझं कुटुंब माझी जबाबदारी, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सगळं कुटुंबावर ढकलून रिकामे झाले. मग शेवटी मी राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून माझ सरकार काय करणार आहे याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं, असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबतीत मुख्यमंत्री काहीतरी बोलतील या आशेवर या संवादाकडे लक्षण लावून होती. पण मुख्यमंत्र्यांनी यावरही खुबीने बोलनं टाळलं, असंही प्रवीण दरेकरांनी
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 30, 2021
महत्वाच्या घडामोडी –
राज्यात सध्या ओबीसींसाठी कोणतंच आरक्षण उरलेलं नाही- देवेंद्र फडणवीस
आरक्षणविरोधात भाजपची वेगळी विचारधारा, ते दुतोंडी चेहऱ्याने वावरतात- नवाब मलिक
राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत- रोहित पवार