मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणाची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे सध्या राज्यात ओबीसींसाठी कोणतंच आरक्षण उरलेलं नाही, असा दावा फडणवीसांनी यावेळी केला.
दरम्यान, 4 मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले होते आणि राज्य सरकारची पुनर्विचार याचिकाही कोर्टाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे ओबीसींचं राजकीय आरक्षण गेलं आहे. सध्या महाराष्ट्रात ओबीसीकरिता कोणतंही आरक्षण राहिलेलं नाही, असं फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
आरक्षणविरोधात भाजपची वेगळी विचारधारा, ते दुतोंडी चेहऱ्याने वावरतात- नवाब मलिक
राज्याला केंद्राप्रमाणे कंपन्या विकून पैसे मिळत नाहीत- रोहित पवार
“योगगुरू रामदेव बाबांविरोधात डाॅक्टरांचं उद्या 1 जून रोजी काळ्या फिती लावून आंदोलन”