मुंबई : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मध्य प्रदेश सरकार आणि काँग्रेसवर सडकून टीका केली. सावरकरांचा गौरव राहूद्या पण अपमान तर करु नका, असा अपमान शिवसेना कितपत सहन करणार?, असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
सावरकरांवर गलिच्छ लिखाण करणाऱ्यांचा कोणत्याही शब्दात निषेध केला तरी कमीच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतमातेची अतूट सेवा केली. मात्र काँग्रेसने सावरकरांवर बलात्कारासारखे आरोप केले आहेत. काँग्रेस पार्टी हे करत असेल आणि शिवसेना केवळ सत्तेच्या लालसेपोटी हे सहन करत असेल तर महाराष्ट्राला याचं उत्तर द्यावं लागेल, असंही ते म्हणाले.
काँग्रेसने राष्ट्रपुरुषांना अपमानित करण्याची मालिका सुरु केली आहे. मध्य प्रदेशात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तोडला. तर काँग्रेसचं मुखपत्र ‘शिदोरी’मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अपमानित करणारा लेख लिहिला आहे. याप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी, अशी मागणीही फडणवीसांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी-
दादा खेळत रहा, वेळ चांगला जाईल; शिवसेनेचा चंद्रकांत पाटलांना टोला
“आपमतलब्यां’चा पराभव झाला, केजरीवालांच्या झाडूने सगळयांना साफ केलं”
आपण यावर विचार करणार आहोत की हा दिवसही इतर दिवसांप्रमाणेच असणार?, सत्यजीत तांबेंचा काँग्रेसला सवाल
तीन पेक्षा ज्यास्त जागा जिंकल्या तर हा भाजपसाठी हा विजयच- चंद्रकांत पाटील