मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे.
राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्यामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. केवळ आणि केवळ राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर पुन्हा अन्याय झाला आहे. राज्य सरकारकडे वारंवार पाठपुरावा करून, वारंवार स्मरणपत्रे पाठवून सुद्धा कोणतीही कारवाई राज्य सरकारने केली नाही. आतातरी नाकर्तेपणा सोडून जागे व्हा, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.
दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणांतर्गत राखीव जागांच्यासंदर्भात राज्य सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्याने केवळ आणि केवळ महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आणि नाकर्तेपणामुळे अखेर ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“आमदार लंके यांचं काम देशासाठीही आदर्शवत”
“आम्ही अजून हिंदुत्व सोडलं नाही, असं तरी आता कोडगेपणाने सांगू नका”
“ठाकरे सरकारने दारूचा प्यालाच उचललाय, दारू-बार याच मुद्द्यावर सरकार झटपट निर्णय घेते”
आधी मराठा आता OBC समाजाची माती केलीत; चित्रा वाघ ठाकरे सरकारवर कडाडल्या