Home महाराष्ट्र “आम्ही अजून हिंदुत्व सोडलं नाही, असं तरी आता कोडगेपणाने सांगू नका”

“आम्ही अजून हिंदुत्व सोडलं नाही, असं तरी आता कोडगेपणाने सांगू नका”

मुंबई : लक्षद्वीपमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर निशाणा साधला. तसेच, लक्षद्वीपमध्ये बीफबंदीच्या कायद्यावरूनही त्यांनी मोदी सरकारला सवाल केला आहे. यावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजानस्पर्धा व जनाब बाळासाहेब ठाकरे पाहिल्यानंतरआता सामना मध्ये गोहत्या समर्थन पाहून म फुलेचे उद्गार नव्या संदर्भात आठवले सत्तेसाठी मती गेली मतीविना हिंदुत्वाचा विचार गेला विचाराविना तत्व गेली तत्वविना आचार गेले आचाराविना सगळेच गेले । इतके अनर्थ एका सत्तेने केले ।।, असं केशव उपाध्ये म्हणाले.

लक्षद्वीपवर गोमांसाला बंदीचा विषय आला शरद पवार नतंर आता इकडे शिवसेनेचा जीव कळवळला आणि सामनाअग्रलेखातून बोंब केली. आम्ही अजूनही #हिंदुत्व सोडले नाही, असे तरी आता कोडगेपणाने सांगू नका., असा हल्लाबोल केशव उपाध्येंनी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“ठाकरे सरकारने दारूचा प्यालाच उचललाय, दारू-बार याच मुद्द्यावर सरकार झटपट निर्णय घेते”

आधी मराठा आता OBC समाजाची माती केलीत; चित्रा वाघ ठाकरे सरकारवर कडाडल्या

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून काहीच चांगलं घडताना दिसत नाही- निलेश राणे

“महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध होता, म्हणूनच आरक्षण गेलं”