Home महाराष्ट्र उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून काहीच चांगलं घडताना दिसत नाही- निलेश राणे

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून काहीच चांगलं घडताना दिसत नाही- निलेश राणे

मुंबई : गेल्या 6 वर्षांपासून चंद्रपूरमध्ये लागू असलेली दारूबंदी अखेर राज्य सरकराने उठवण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.

ना मराठ्यांचे आरक्षण टिकवले ना ओबीसींचे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून काहीच चांगलं घडताना दिसत नाही, असं म्हणत निलेश राणेंनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

दरम्यान, स्वत:ला ओबीसी नेते म्हणणारे सरकारमधील मंत्री गेलेत कुठे? की फक्त सत्तेसाठी समाजाचे राजकारण करायचे. या पनवती ठाकरे सरकारला फक्त दारूबंदी उठवायला जमली, असंही निलेश राणे म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध होता, म्हणूनच आरक्षण गेलं”

धनंजय मुंडेंचं काम पसंत नव्हतं, म्हणून मी राजकारणात आले- पंकजा मुंडे

‘क्या हुवा तेरा वादा जयंतराव जी’, जयंत पाटलांचा व्हिडिओ शेअर करत चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

“ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द हे भाजपचे पाप, फडणवीसांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा”