Home महाराष्ट्र “ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द हे भाजपचे पाप, फडणवीसांचे आरोप म्हणजे चोराच्या...

“ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द हे भाजपचे पाप, फडणवीसांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा”

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील अतिरिक्त ओबीसी आरक्षण रद्द ठरवले आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले, याला सर्वस्वी भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

घटनेच्या कलम 340 नुसार इतर मागास वर्गाला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अधिकार मिळाले आहेत. पण केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून जाणीवपूर्वक ओबीसींवर अन्याय केला जात आहे. यातील वस्तुस्थिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना माहीत आहे. पण ते जाणीवपूर्क खोटे बोलून दिशाभूल करत असून त्यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत., असा हल्लाबोल नाना पटोलेंनी यावेळी केला.

दरम्यान, ओबीसींच्या पाठिंब्यावरच भाजपला केंद्रात व राज्यात सत्ता मिळाली. फडणवीसांनी त्यांच्या कार्यकाळात समांतर आरक्षणाचा निर्णय घेत ओबीसींच्या रिक्त जागांची भरती केली नव्हती. त्यामुळे त्यांना ओबीसींचे आरक्षण संपवायचे होते हे स्पष्टच आहे. आता फडणवीस खोटे बोलून राजकारण करून त्यांचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे पाप लपवण्याचे काम करत आहेत, अशी टीका नाना पटोलेंनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

अनिल देशमुख, अनिल परब यांच्यानंतर आता जितेंद्र आव्हाडांचा नंबर- किरीट सोमय्या

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव- गोपीचंद पडळकर

मराठा समाज तसाही अजित पवारांना रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही- चंद्रकांत पाटील

कोरोना काळात मयताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या काही औलादी आहेत; अजित पवार भडकले