मुंबई : आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील घवघवीत यशा यानंतर देशभरातून अरविंद केजरीवाल यांच्यासह आपचं अभिनंदन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आजच्या सामना अग्रलेखातून भाजपवर टीका करत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं कौतुक केलं आहे.
भाजप हिंदू-मुसलमान, पाकिस्तान वगैरे बोंबलत बसले. पण शेवटी विजय केजरीवाल यांच्या ‘आप’चा झाला. ‘आपमतलब्यां’चा पराभव झाला. केजरीवाल यांच्या झाडूने सगळयांना साफ केलं. केजरीवाल यांचे अभिनंदन!, असं शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचे सुत्रधार अमित शहा हेच होते. पक्षाचं अध्यक्षपद सोडताना त्याना एक तरी विजय मिळवायचा होता. पण ते शक्य झालं नाही. झारखंडमध्ये पराभव झाला व ध्यानीमनी नसताना महाराष्ट्रासारखे महत्त्वाचे राज्य हातचे गेले. देशाच्या राजधानीवर ‘आप’चा झेंडा फडकला, असं आग्रलेखात म्हंटलं आहे.
दरम्यान, आर्थिक राजधानीवर शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्य करीत आहे. हा बाण भाजपच्या काळजात आरपार खुपणारा आहे. लोकसभा निवडणुकीतील मोठय़ा विजयानंतर भाजपला एकापाठोपाठ एक राज्ये गमवावी लागली आहेत, असंही अग्रलेखात म्हणण्यात आलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
आपण यावर विचार करणार आहोत की हा दिवसही इतर दिवसांप्रमाणेच असणार?, सत्यजीत तांबेंचा काँग्रेसला सवाल
तीन पेक्षा ज्यास्त जागा जिंकल्या तर हा भाजपसाठी हा विजयच- चंद्रकांत पाटील
भाजपच्या ‘ह्या’ खासदाराने केलं अरविंद केजरीवाल यांचं कौतुक
सीएएचा दिल्लीच्या निकालांशी काहीही संबंध नाही- सुधीर मुनगंटीवार