कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या मुद्यावर भाजप नेते आणि खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांच्यात वाद विवाद होताना दिसतो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चार चार वेळेस पत्र लिहून भेट मागितली पण संभाजी छत्रपतींना मोदींनी भेट दिलेली नाही. त्यावर खुद्द संभाजी छत्रपतींनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवरभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपानं पक्ष म्हणून किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत. केला गेलेला सन्मान हा बहुदा इतरांना माहित नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. ते कोल्हापूरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, आमच्याकडून संभाजीराजेंबद्दल अपशब्द निघणार नाही एवढच नाही तर नेतृत्व करणाऱ्यासोबत पक्ष झेंडा बाजुला ठेऊन आम्ही सहभागी होणार, असही चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“शिवसेना नाराज ही केवळ अफवा, शरद पवारांचा या सरकारला पूर्ण आशीर्वाद असून सरकार 5 वर्ष चालणार”
मी भाजपा ची पोलखोल करणार; सचिन सावंतांचा इशारा
मालकाच्या कर्तृत्वाचं असं जाहीर पोतेरं करू नये; अतुल भातखळकरांचा संजय राऊतांना टोला
“शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची वर्षा निवासस्थानी भेट”