Home महाराष्ट्र हे काही खुळं सरकार नाही ना…; मराठा आरक्षणावरुन संभाजीराजे संतापले

हे काही खुळं सरकार नाही ना…; मराठा आरक्षणावरुन संभाजीराजे संतापले

औरंगाबाद : भाजपा खासदार संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणावरुन आक्रमक भूमिका मांडली असून असून सरकारने काहीच केलं नाही तर रस्त्यावर उतरु असा इशारा दिला आहे. ते औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

“सरकारी दरबारी विषय पोहोचवायचा असेल तर रस्त्यावर आंदोलन करावं लागतं. 58 मोर्चे काढून हा विषय पोहचवला आहे, सरकारला सर्व गोष्टी माहिती आहे. हे काही खुळं सरकार नाही ना, म्हणूनच ते सरकार झालं आहे. पुन्हा एकदा लोकांना वेठीस धरणं या मताचा मी नाही. मी शिव शाहूंचा वंशज असून सामान्यांची काळजी करणं कर्तव्य आहे. करोना संकट असल्याने लोकांचा जीव धोक्यात घालू शकत नाही. आंदोलन करावं की नाही हा नंतरचा प्रश्न आहे. सरकार कोणतीही दखल घेत नसेल तर रस्त्यावर उतरुन आंदोलन करावंच लागेल,” असं संभाजीराजे भोसलेंनी म्हटलं आहे.

“सरकारच्या हातात अनेक गोष्टी आहेत. त्यामुळे सर्वात प्रथम जबाबदारी राज्यकर्त्यांची असून त्यात माझ्यासकट खासदार, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेत्यांची आहे. त्यामुळे समाजाला वेठीस धरु नका. इतर बहुजन समाजातील लोकांना कसा न्याय देत आहात? माझ्यासहित जो श्रीमंत वर्ग आहे त्यांना एक टक्काही मदत देऊ नका. पण जो 30 टक्के गरीब समाज आहे त्यासाठी अपवादात्मक मदत कशी करणार ते सांगा,असंही संभाजीराजे भोसले यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जे राज्याच्या हातात आहे ते राज्याने आणि केंद्राने त्यांच्या हातात आहे ते करावं आणि मराठा आरक्षण प्रश्न निकाली काढावा अशी मागणीही संभाजीराजे यांनी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

मुंबई महापालिकेचा कोविड लस घोटाळा; किरीट सोमय्यांचा आरोप

कोकणाच्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी! ताैक्ते चक्रीवादळग्रस्तांसाठी 250 कोटींची मदत- विजय वडेट्टीवार

“आजोबांनी आयपीएल आणून चीअरलीडर्स नाचवल्या, नातू कोविड सेंटर मध्ये नाचतो”

भाजपने पनवती म्हणून नारायण राणेंना अडगळीत टाकलंय, म्हणून ते अजून कोकणातही गेलेले नाहीत”