Home महाराष्ट्र राज्यपालांनी 12 आमदारांच्या फाईलवर सही केली तर आम्ही पेढे वाटू- संजय राऊत

राज्यपालांनी 12 आमदारांच्या फाईलवर सही केली तर आम्ही पेढे वाटू- संजय राऊत

मुंबई : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून राज्यपालांकडे सुपुर्द करण्यात आली होती. नवाब मलिक, अनिल परब यांनी ही यादी राजभवनावर पोहचवली होती. मात्र त्यानंतर आतापर्यंत राज्यपालांनी या यादीवर अजून सही केलेली नाही. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत राज्यपालांवर निशाणा साधला.

12 आमदारांच्या नावासंदर्भात इतके दिवस उलटूनही का निर्णय होत नाही? ही काही बोफोर्स, राफेल किंवा एखाद्या ठेकेदाराची फाईल आहे का?, असा उपरोधक टोमणा संजय राऊतांनी कोश्यारी यांना लगावला. तसेच राज्याच्या मंत्रिमंडळाने एकमताने मंजूर केलेल्या आमदारांची ही नावे आहेत. त्यावर 6-7 महिने निर्णय होत नाही. राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. त्यामुळे राज्यपालांनी या गोष्टीचं भान ठेवावं, असा सल्लाही संजय राऊतांनी कोश्यारी यांना दिला.

दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या पदाला शोभेणारं काम केलं पाहिजे. आता जर त्यांनी विधानपरिषदेतील 12 आमदारांच्या फाईलवर सही केली की आम्ही पेढे वाटू, असा टोला संजय राऊतांनी भगतसिंह कोश्यारी यांनी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉ. अब्दुल गफ्फार मलिक यांचं दु:खद निधन”

मुख्यमंत्री जे फेसबुक वरून देतात ते ज्ञान, अज्ञान की वाफा असा प्रश्न आमच्याही मनात- अतुल भातखळकर

“मुख्यमंत्री टीव्हीवर येऊन फक्त ज्ञान देतात, आता काहीही कारवाई करा, पण 1 जूनपासून दुकानं उघडणार”

“तौते वादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत संजय राऊतांचा अभ्यास कमी पडला”