औरंगाबाद : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यात 1 जूनपर्यंत लाॅकडाऊन लावण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. मात्र तरीही रूग्णसंख्या कमी होत नसल्याने पुन्हा लाॅकडाऊन वाढविला येईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी प्रतिक्रिया देत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
ठाकरे सरकारने आता कोणतीही कारवाई केली तर आम्ही 1 जूनपासून औरंगाबादमधील दुकानं उघडणारचं, असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे. ते आज औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला.
उद्धव ठाकरे टीव्हीवर येऊन फक्त ज्ञान देतात. त्यांना राज्याच्या दृष्टीने काय चांगला निर्णय घ्यायचाय तो घेऊ दे. पण औरंगाबादसाठी आम्ही हा निर्णय मान्य करणार नाही. तसेच आम्ही 1 जुनपासून दुकानं उघडणारच, असं इम्तियाज जलील यांनी यावेळी म्हटलं. ते औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी हा इशारा दिला.
दरम्यान, दुकानदारांचे हप्ते आणि त्यावरील व्याज माफ करण्यासाठी बँका तयार आहेत, असं सरकारने जाहीर करावं. नाहीतर राज्य सरकारने लॉकडाऊन वाढवला तरी आम्ही तो झुगारुन दुकानं सुरु करु. मग सरकारला जे काही करायचय ते करु द्या, असंही इम्तियाज जलील यांनी यावेळी ठणकावून सांगितलं.
महत्वाच्या घडामोडी –
“तौते वादळामुळे झालेल्या नुकसानीबाबत संजय राऊतांचा अभ्यास कमी पडला”
“महाविकास आघाडी सरकारच्या निष्काळजीपणामुळे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात”
चंद्रकांत पाटल्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर सचिन सावंताची टीका; म्हणाले…
राजीनामा देऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटणार असेल तर मी आताच खासदारकीचा राजीनामा देईन- संभाजीराजे