सोलापूर : राजीनामा देऊन मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मिटणार असेल तर मी आताच खासदारकीचा राजीनामा देईन, असा इशाराच भाजपचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.
छत्रपती शाहू महाराजांचा आशीर्वाद घेऊन संभाजी छत्रपती आजपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात ते राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतच्या भावना जाणून घेणार आहेत. त्यानंतर येत्या 27 मे रोजी मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षनेते आणि इतर ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा करणार आहेत.
मराठा आरक्षणाबाबत मी अनेक कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली आहे. त्यांनी काही सल्ले दिले आहेत. त्याची माहिती सरकारला देणार आहे. आंदोलन हा एक भाग असू शकतो. पण मराठा आरक्षणाबाबत सरकारला काय सूचना करता येईल? मराठा आरक्षणावर काय कायदेशीर मार्ग आहे? याची माहिती घेण्यासाठी हा दौरा करण्यात येत आहे, असं संभाजीराजे म्हणाले.
दरम्यान, संभाजीराजे आज सोलापूरमध्ये आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात ते बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
“पंतप्रधान मोदींना वाटतं मराठा आरक्षण हा राज्याचा विषय, म्हणून ते संभाजीराजेंना भेटले नाहीत”
“मुंबई उपनगरात आदित्य ठाकरेंना दाखवा, 18 ते 44 वयोगटातील लसीकरण फुकट मिळवा”
नुकसानग्रस्तांना राज्य सरकार मदत करेलच, पण फडणवीसांनीही केंद्राला पत्र लिहावं- रोहित पवार