Home महाराष्ट्र “पंतप्रधान मोदींना वाटतं मराठा आरक्षण हा राज्याचा विषय, म्हणून ते संभाजीराजेंना भेटले...

“पंतप्रधान मोदींना वाटतं मराठा आरक्षण हा राज्याचा विषय, म्हणून ते संभाजीराजेंना भेटले नाहीत”

मुंबई : काही दिवसांपूर्वी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पत्रकारांशी बोलताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट हवी होती. त्यासाठी मी चारवेळेला पंतप्रधान मोदींना पत्रही दिलं. मात्र, अद्याप त्यांनी मला भेटीसाठी वेळ दिलेली नाही, असं म्हणत संभाजीराजेंनी नाराजी व्यक्त केली होती. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मराठा आरक्षण हा राज्याचा विषय आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाटतं. त्यामुळेच पंतप्रधान मोदी यांची आजपर्यंत संभाजीराजे छत्रपतींशी भेट होऊ शकली नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आंदोलन झालं तर भाजपचे कार्यकर्ते त्यामध्ये पक्षाचा झेंडा आणि बॅनर बाजूला ठेवून सहभागी होतील, असंही चंद्रकांत पाटलांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“मुंबई उपनगरात आदित्य ठाकरेंना दाखवा, 18 ते 44 वयोगटातील लसीकरण फुकट मिळवा”

महाराष्ट्राचे उद्धव ठाकरेच बेस्ट CM! कोरोनाची दुसरी लाट यशस्वी हाताळणारे मुख्यमंत्री म्हणून मिळाली पसंती

नुकसानग्रस्तांना राज्य सरकार मदत करेलच, पण फडणवीसांनीही केंद्राला पत्र लिहावं- रोहित पवार

“महाराष्ट्रातलं सध्याचं सरकार आपण घालवू या फाजील विश्वासावर विरोधी पक्ष जगतोय”