मुंबई : नुकत्याच झालेल्या तौत्के चक्रीवादळामुळे गुजरात आणि महाराष्ट्रासह इतर दोन राज्यातही मोठं नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीबद्दल केंद्राला पत्र लिहावं, असं म्हटलं आहे.
महाराष्ट्रसह इतर ही दोन राज्यांमध्ये झालेल्या नुकसानीसाठी केंद्राकडून मोठ्या प्रमाणात मदत केली जाईल अशी अपेक्षा आहे. तसेच राज्य सरकार तर नुकसानग्रस्तांना मदत करेलच, मात्र केंद्राकडून राज्याला मदत मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केंद्राला पत्र जाईल अशी अपेक्षा आहे, असं रोहित पवार म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
“महाराष्ट्रातलं सध्याचं सरकार आपण घालवू या फाजील विश्वासावर विरोधी पक्ष जगतोय”
कोकणात वादळ चार तास थांबलं पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तीन तासही थांबले नाहीत- प्रवीण दरेकर
“ज्या शिवसेनेला कोकणाने भरभरून बळ दिलं त्या शिवसेनेनं कोकणाला वाऱ्यावर सोडून दिलं”
गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपीच आता बंद करा- नवाब मलिक