रत्नागिरी : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी 1 जूनपर्यंत वाढवण्यात आला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली. मात्र तरीही रूग्णसंख्या ही जास्त असल्यानं राज्यात पुन्हा लाॅकडाऊन लागेल का? असा प्रश्न पुन्हा उपस्थित होत आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सध्या परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसार नंतर निर्णय घेऊ, पण कोणीही गाफील राहू नये, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. तसेच कोरोना कमी होतोय हे नक्कीच पण त्यासंबंधी काही बोलणार नाही. गेल्या लाटेच्या वेळी आपण अनुभव घेतला आहे. गेल्यावेळीही आपण कोरोनावर नियंत्रण मिळवलं होतं. पण थोडीशी शिथिलता आली आणि कोविड चौपटीने वाढला, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ते रत्नागिरीत माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, सध्याचा कोरोना विषाणू फार घातक आहे, अत्यंत वेगाने पसरतोय. काही पटींमध्ये लोकांना हा बाधित करत आहे. सध्या गेल्या वेळच्या तुलनेत वाईट परिस्थिती आहे हे लक्षात घेतल्यानंतर पुढे कधी आपण निर्बंध शिथील करु तेव्हा मागील अनुभवातून शहाणं व्हावं लागेल. सुरक्षेचे नियम पाळावेच लागतील, असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“वादळाचा फटका पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीलाही बसला, तिकडे मुख्यमंत्री का गेले नाहीत?”
राष्ट्रवादीच्या हटवादासमोर उद्धव ठाकरेंना झुकावं लागलं; अतुल भातखळकरांची टीका
“देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाज आणि ओबीसी समाजाला भडकवण्याचं राजकारण बंद करावं”