मुंबई : मागील काही दिवसांपासून दक्षिण आफ्रिकेचा माजी विस्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्स आगामी टी-20 वर्ल्डकपसाठी आपली निवृत्ती मागे घेणार असल्याच्या चर्चा समोर येत होत्या. मात्र या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाने डिव्हिलियर्स आपली निवृत्ती मागे घेणार नसल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे तो यावर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये सहभागी होणार नाही, असं दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डानं म्हटलं आहे., असं आयसीसीच्या अधिकृत ट्विट हॅंडलवरून सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, डिव्हिलियर्सने यंदाच्या आयपीएलमध्ये आरसीबी संघाकडून चांगली कामगिरी केली होती. ज्यात त्याने 7 सामन्यात 2 अर्धशतकांसह 207 धावा केल्या होत्या. यात 16 चौकार आणि 10 षटकारांचा समावेळ होता. या हंगामादरम्यान त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कमबॅकविषयी चर्चा रंगली होती.
Cricket South Africa have confirmed that star batsman @ABdeVilliers17 will not come out of his retirement.
Hence, he will not participate in this year’s @T20WorldCup. pic.twitter.com/fHxmYjQsDE
— ICC (@ICC) May 18, 2021
महत्वाच्या घडामोडी –
‘केम छो वरळी’ विचारणारा आमदार कुठे आहे?; एका पावसात वरळी पॅटर्न लोकांना दिसलं
“केंद्र सरकारने दिलेले व्हेंटिलेटर फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांनी सुरू करून दाखवावे”
“महाराष्ट्र संकटात असताना अमृता फडणवीसांना शेरोशायरी सुचते, यामधून त्यांना सत्तेची लालसा दिसून येते”
छोटी शहरं आणि गावातील आरोग्य व्यवस्था राम भरोसे; उच्च न्यायालयानं योगी सरकारला सुनावलं