Home महाराष्ट्र “मुंबईकरांचे जे नुकसान झाले त्यापासून कंत्राटदार आणि सत्ताधाऱ्यांना पळ काढता येणार नाही”

“मुंबईकरांचे जे नुकसान झाले त्यापासून कंत्राटदार आणि सत्ताधाऱ्यांना पळ काढता येणार नाही”

मुंबई : मुंबईत सोमवारी पहाटेपासून तौक्ते चक्रीवादळाचा मोठा जोर पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहत असल्याने मुंबईत 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी पालिका आयुक्तांशी चर्चा केली आणि मदत कार्याची माहिती घेतली.

मुंबईत आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असून पालिका कर्मचारी, अधिकारी तैनात आहेत! पण जे नुकसान मुंबईकरांचे झाले त्यापासून कंत्राटदार आणि सत्ताधाऱ्यांना पळ काढता येणार नाही!, असा इशारा आशिष शेलारांनी यावेळी दिला.

महत्वाच्या घडामोडी –

तुफां तो इस शहर ने अक्सर झेला है…; रूपाली चाकणकरांचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर

सतत केंद्राकडे बोट दाखवण्याची सवय सोडा, आणि…; देवेंद्र फडणवीसांचा राज्य सरकारला सल्ला

हे तर ग्रहणांचेही बाप आहेत; चक्रीवादळावरून नितेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका

मला तर वाटतं आपण मनोरुग्ण झालात; भाजप आमदार राम सातपूतेंची नवाब मलिकांवर टीका