नगर : केंद्राकडे बोट दाखवण्याची राज्य सरकारला सवय लागली आहे. आता ही सवय सोडा आणि कधी तरी आत्मचिंतन करा, असा सल्ला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे.
चांगलं झालं आपली पाठ थोपटून घेतात. पण त्यात काही उणीव दिसली की लगेच केंद्राकडे बोट दाखवतात. राज्य सरकारचं असं वागणं बरं नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. दरम्यान, कोपरगाव येथे 40 ऑक्सिजन बेडच्या कोविड सेंटरचं देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते.
आपलं अपयश झाकण्यासाठी केंद्राकडे बोट दाखवण्याची राज्य सरकारला सवय लागली आहे. त्यांनी कधी तरी आत्मचिंतन केलं पाहिजे. कधी काय करावं याचा विचार सरकारने केला पाहजे. आपत्ती कोणत्याही एका पक्षाची नसते. आपत्तीत सर्वांनी मिळून काम करायचं असतं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
हे तर ग्रहणांचेही बाप आहेत; चक्रीवादळावरून नितेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका
मला तर वाटतं आपण मनोरुग्ण झालात; भाजप आमदार राम सातपूतेंची नवाब मलिकांवर टीका
“किसान सन्मान निधी’चे पैसे तुघलकी पद्धतीने वसूल करायचं मोदी सरकारने ठरवलं का?”
“मी मोदींना नेहमीच पत्रं लिहीत असतो, पण काहींना कांगावा करण्याची सवय आहे”