Home महाराष्ट्र मला तर वाटतं आपण मनोरुग्ण झालात; भाजप आमदार राम सातपूतेंची नवाब मलिकांवर...

मला तर वाटतं आपण मनोरुग्ण झालात; भाजप आमदार राम सातपूतेंची नवाब मलिकांवर टीका

मुंबई : सर्वच जर केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का?, असा सवाल करत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. याला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं होतं, आता  भाजपा आमदार राम सातपुते यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे.

“आम्ही समजू शकतो मलिकजी आपण मंत्री असताना आपला जावई ड्रग केसमध्ये तुरुंगात आहे. आपण रोज घरी गेलात की बायका पोरं भांडत असतील आणि म्हणत असतील जावयाला बाहेर काढू शकत नाही.. असो आपली अवस्था आम्ही समजू शकतो. मला तर वाटतं आपण मनोरुग्ण झाला आहात. सांभाळा स्वतःला,” असं राम सातपुते यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या आधीही माशा मारण्याचा अर्थ कदाचित नवाब मलिक यांना ठावूक नसावा किंवा कळून वळत नसावा. माशा मारण्याची स्पर्धा तर गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरूच आहे. सत्ताधारी घरात लपून आहेत आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस प्रत्येक जिल्ह्यात प्रवास करता आहेत. अशी टीका भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली होती. आता राम सातपुते यांनीही टीका केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“किसान सन्मान निधी’चे पैसे तुघलकी पद्धतीने वसूल करायचं मोदी सरकारने ठरवलं का?”

“मी मोदींना नेहमीच पत्रं लिहीत असतो, पण काहींना कांगावा करण्याची सवय आहे”

“अजितजदादा तुमच्या मनात बहुजनांविषयी आकस, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का?”

भाजप मराठा आरक्षणाच्या बाजूने आणि मराठा समाजाच्या सोबत- प्रवीण दरेकर