मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.
महाविकास आघाडी सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यात कुठे कमी पडले, याची पोलखोल करण्यासाठी आम्ही लवकरच कायदेज्ञांची समिती स्थापन करणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी यावेळी म्हटलं. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. घटनात्मक कार्यवाही करून हे आरक्षण देण्यात आले होते. हायकोर्टातही हे आरक्षण टिकवलं होतं आणि सर्वोच्च न्यायालयात या आरक्षणाला वर्षभर स्थगिती मिळवू दिली नाही. पण आघाडी सरकारने सत्तेत येताच या आरक्षणाचा खून केला आणि मुडदा पाडला, असा हल्लाबोल चंद्रकांत पाटलांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
गोपीनाथ मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला- पंकजा मुंडे
पेट्रोल-डिझेलपाठोपाठ खतांच्या किंमतीत वाढ; राष्ट्रवादीचं राज्यभर आंदोलनाचा इशारा
मुंबई मॉडेल पचत नसल्यानेच फडणवीस खोटी माहिती पसरवत आहेत- नवाब मलिक
डिअर राजीव, वुई विल मिस यू; राजीव सातव यांच्या निधनावर सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना