पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला आहे.
मराठा आरक्षणाबाबत खरं बोलल्यानं अशोक चव्हाणांना राग आला आहे. त्यांना राग येतो म्हणून आम्ही मराठा आरक्षणाच्या विषयात गप्प बसणार नाही. तसेच कोरोनाचे कारण दाखवून मराठा समाजातील तरूण तरुणींना संताप व्यक्त करण्यापासून रोखताही येणार नाही, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
सुप्रीम कोर्टाच्या निकालात एक परिच्छेद आहे की, राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालाच्या मराठी मजकुराचा इंग्रजी अनुवाद मिळाला नाही. निर्णयाच्या एक परिच्छेदात असेही म्हटले आहे की, मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालय स्थगिती देणार नव्हते परंतु स्थगिती न देता खटला चालवू म्हटल्यानंतर महाविकास आघाडी सरकारकडून प्रत्येक वेळा तारीख मागितली गेली. अखेर नाईलाजाने न्यायालयाला स्थगिती द्यावी लागली., असं चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, सामान्यतः कायद्याला स्थगिती मिळत नाही. पण राज्य सरकारकडून चालढकल चालू आहे, हे कोर्टाच्याही ध्यानात आले. मराठा आरक्षणाबाबत आघाडी सरकारने दुर्लक्ष केले. त्यांना हे आरक्षण द्यायचे नव्हते. तर त्याबद्दल बोलायचे नाही का?, असा हल्लाबोल चंद्रकांत पाटलांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
“कोरोनाच्या संकटकाळात कामासाठी फडणवीस आणि माझ्याइतकं कोणताच नेता फिरला नसेल”
माशा मारण्याचा अर्थ कदाचित नवाब मलिकांना ठावूक नसावा किंवा…- केशव उपाध्ये
राज्याच्या हिताचे प्रश्न केंद्राकडे मांडण्यात विरोधी पक्ष कमी पडला- रोहित पवार
देवेंद्र फडणवीसांचं सोनिया गांधींना पत्र; म्हणाले…