Home महाराष्ट्र माशा मारण्याचा अर्थ कदाचित नवाब मलिकांना ठावूक नसावा किंवा…- केशव उपाध्ये

माशा मारण्याचा अर्थ कदाचित नवाब मलिकांना ठावूक नसावा किंवा…- केशव उपाध्ये

मुंबई : सर्वच जर केंद्राने करायचं तर राज्यांनी काय माशा मारायच्या का?, असा सवाल करत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. याला राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं होतं, आता भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंनी नवाब मलिक यांच्यावर पलटवार केला आहे.

माशा मारण्याचा अर्थ कदाचित नवाब मलिक यांना ठावूक नसावा किंवा कळून वळत नसावा. माशा मारण्याची स्पर्धा तर गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रात अखंड सुरूच आहे. सत्ताधारी घरात लपून आहेत आणि आमचे नेते देवेंद्र फडणवीस प्रत्येक जिल्ह्यात प्रवास करता आहेत. असं केशव उपाध्ये यांनी म्हटलंय.

आता ज्या जिल्ह्याचे आपण पालकमंत्री आहात, तेथे तरी किती वेळा गेलात? 10 बालकांचे हत्यारे अजून का मोकळे आहेत? बाकी तुम्ही लोकांचे जीव वाचविण्यासाठी काम करताहात की गेलेले जीवांचे आकडे लपविण्यासाठी हे महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी पाहतो आहेच!” असंही केशव उपाध्ये म्हणाले आहेत.

दरम्यान, फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे? आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी काम करत आहोत व करत राहू. तुम्ही माशा मारण्यातच आनंद घ्या. गरज पडल्यास भाजप माशा मारणे स्पर्धाही भरवा!, असं नवाब मलिक यांनी म्हटलं होतं.

महत्वाच्या घडामोडी –

राज्याच्या हिताचे प्रश्न केंद्राकडे मांडण्यात विरोधी पक्ष कमी पडला- रोहित पवार

देवेंद्र फडणवीसांचं सोनिया गांधींना पत्र; म्हणाले…

“फडणवीसजी तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलं आहे?”

करूणा धनंजय मुंडेच्या पुस्तक प्रकाशनापूर्वी वाद; मुख्यमंत्र्यांकडे तक्रार दाखल