मुंबई : बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करत मोठी घोषणा केली आहे.
करुणा धनंजय मुंडे यांनी आपल्या जीवनावर आधारीत पुस्तक प्रकाशन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. माझ्या जीवनावर आधारित सत्य प्रेम जीवनगाथा लवकर प्रकाशन प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे. त्याचे प्रकाशन लवकर केले जाणार आहे, असं म्हणत करुणा धनंजय मुंडे यांनी सोबत फोटो शेअर केला आहे. मात्र या पुस्तकाच्या प्रकाशनापुर्वीच आता त्या पुस्तकावरून वाद निर्माण झाला आहे.
आता या फेसबूक पोस्टमध्ये वापरलेल्या एका पुस्तकाच्या कव्हर पेजवरील मजकुरामुळं वाद निर्माण झाला आहे. करुणा यांनी केलेल्या पोस्टमधील फोटोमुळं धार्मिक भावना दुखावल्याची तक्रार आता थेट मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
मात्र या पुस्तकाच्या कव्हर पेजवर ‘होली बायबल’ असं लिहिलेलं आहे. तर त्याच्या खाली मोठ्या अक्षरात प्रेम शब्द लिहिला आहे. सोशल मीडियावर काही लोकांनी होली बायबल शब्दावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आता ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्या असल्याचं म्हटलं गेलं आहे.
दरम्यान, अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तुम्ही पंतप्रधान होण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलंत- गोपीचंद पडळकर
“कुठून हे नग मिळतात?”; जितेंद्र आव्हाडांची भाजपाच्या माजी मुख्यमंत्र्यांवर टीका
लस घेताना केलेल्या ड्रामामुळे अभिनेत्री हिना पांचाळ झाली ट्रोल; पहा व्हिडिओ
“पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री गायब, देश रामभरोसे; अहंकार बाजूला ठेऊन महाराष्ट्र मॉडेल लागू करा”