Home महाराष्ट्र मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत 3 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करा- चंद्रकांत पाटील

मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत 3 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करा- चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत 3 हजार कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात यावं, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत शिक्षण व रोजगारासाठी सवलती मिळणे गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने राबवलेले ‘जे ओबीसींना ते मराठ्यांना’ हे सूत्र अंमलात आणावे. त्यासाठी 3 हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे., असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ते कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, त्यापैकी अण्णासाहेब पाटील महामंडळाला 1 हजार कोटी रुपये द्यावेत व त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करावी. सारथी संस्थेला 500 कोटी रुपये द्यावेत. तसेच मराठा समाजातील विद्यार्थी विद्यार्थीनींची निम्मी फी भरण्यासाठी 600 कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी –

महाविकास आघाडी सरकारच्या मनात पाप, त्यांना मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही- विनायक मेटे

चंद्रकांत पाटील यांना मानसिक उपचाराची गरज- अशोक चव्हाण

जयंत पाटील हे शांत स्वभावाचे, मीच तापट; कुंटे-पाटील वादात तथ्य नाही- अजित पवार

कोरोना विरूद्धच्या लढाईत भारत अजून हरलेला नाही- पंतप्रधान नरेंद्र मोदी