मुंबई : कोरोनाचा धोका अद्यापही कमी झाला नसल्याने राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली.
कोणतही नियोजन न करता लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे कष्टकरी वर्ग आणखी अडचणीत सापडला आहे, त्यांच्यासाठी सरकार काय करणार? असा प्रश्न प्रवीण दरेकरांनी यावेळी उपस्थित घेतला. ते माध्यमांशी बोलत होते.
दरम्यान, लॉकडाउन वाढवण्यापूर्वी छोटे व्यावसायिक आणि कष्टकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी भूमिका भाजपच्या वतीने वारंवार मांडली गेली होती, मात्र सरकारने याचा विचार न करता लॉकडाउन जाहीर केला. मागच्या लॉकडाउनमध्ये जे पॅकेज सरकारने जाहीर केलं तेही अजून सर्व लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेलं नाही., असं दरेकर म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
टीका झाली नसती तर अजित पवारांनी 6 कोटी वापरले असते; निलेश राणेंचा हल्लाबोल
“सोशल मिडियासाठी 6 कोटी खर्च करण्याचा अजित पवारांचा निर्णय रद्द”
म्हाताऱ्या आज्जीने केला तुफानं डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल; पहा व्हिडिओ
हे धक्कादायक आहे, जिवंतपणी उपचार नाही अन्…; रोहित पवारांची योगी सरकारवर टीका