मुंबई : सोशल मीडिया हाताळण्यासाठी सहा कोटी खर्च करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवारांनी रद्द केला आहे.
अजित पवारांचे सोशल मीडिया अकाऊंट्स सांभाळण्याची जबाबदारी बाहेरील एजन्सीवर सोपवण्यात येणार होती. यासाठी ठाकरे सरकार जवळपास 6 कोटी रुपये खर्च करणार होतं. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने यासंबंधीचा आदेश जारी केला होता. अजित पवार यांनी घेतलेले निर्णय सामान्यांपर्यंत पोहचावेत याची जबाबदारीही या एजन्सीवर देण्यात येणार होती. अजित पवारांचं ट्विटर हॅण्डल, फेसबुक, ब्लॉगर, युट्यूब, इन्स्टाग्राम अकाऊंट्स हाताळण्याची तसंच साऊंड क्लाऊड, व्हॉट्सअॅप बुलेटिन, टेलिग्राम चॅनेल आणि एसएमएस या जबाबदाऱ्याही त्यांच्याकडे देण्यात येणार होत्या.
दरम्यान, उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मीडिया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची अजिबात गरज नाही. यासंदर्भातील शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देश अजित पवार यांनी दिले आहेत. उपमुख्यमंत्री कार्यालयाला समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून शासकीय जनसंपर्काची जबाबदारी पार पाडणे शक्य असताना उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समाजमाध्यमांची जबाबदारी बाह्ययंत्रणेवर सोपवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही., असं अजित पवार म्हणाले.
दरम्यान, सद्यस्थितीत उपलब्ध जनसंपर्क व्यवस्थेद्वारेच यापुढेही नागरिकांशी, प्रसिद्धी माध्यमांशी संवाद ठेवण्यात येईल, असंही अजित पवार यांनी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
म्हाताऱ्या आज्जीने केला तुफानं डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल; पहा व्हिडिओ
हे धक्कादायक आहे, जिवंतपणी उपचार नाही अन्…; रोहित पवारांची योगी सरकारवर टीका
“ठाकरे सरकार शिवसेना भवनावरून करिना, कतरिनाला पैसे देऊन ट्विट करायला सांगतात”
“राज्यात 1 जूनपर्यंत लाॅकडाऊन वाढवला”