Home महाराष्ट्र “राज्यात 1 जूनपर्यंत लाॅकडाऊन वाढवला”

“राज्यात 1 जूनपर्यंत लाॅकडाऊन वाढवला”

मुंबई : कोरोनाचा धोका अद्यापही पूर्णपणे टळलं नसल्यानं ठाकरे सरकारने लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंबंधी मुख्यमंत्री निर्णय घेतील अशी माहिती दिली होती. त्याप्रमाणे 1 जूनपर्यंत लॉकडाउन वाढवत असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्ध करत अधिकृत आदेश मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत.

बाहेरुन राज्यात येणाऱ्या लोकांना RTPCR चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारे प्रवेश करणाऱ्या व्यक्तीकडे निगेटिव्ह RTPCR चाचणी रिपोर्ट बंधनकारक असून प्रवेश करण्याच्या 48 तास आधी हा रिपोर्ट काढलेला असावा असं या आदेशात नमूद केलं आहे.

कार्गो कॅरिअरमध्ये चालक आणि क्लिनर अशी दोघांनाच परवानगी असणार आहे. जर हे कार्गो कॅरिअर बाहेरच्या राज्यातून प्रवेश करत असतील तर निगेटिव्ह आरटीपीसीआर टेस्ट रिपोर्ट बंधनकारक असून 48 तासांच्या आत तो काढलेला असावा., असंही या आदेशात नमूद आहे.

दरम्यान, तसेच देशातील कोणत्याही भागातून राज्यात येणाऱ्यांसाठी आधीचे नियम लागू असतील.

महत्वाच्या घडामोडी –

“महाराष्ट्र मॉडेल…महाविकास आघाडीच्या आमदारावर जर दिवसाढवळ्या गोळीबार होत असेल तर…”

केंद्रावर खापर फोडण्याची राज्य सरकारची खेळीदेखील न्यायालयात उघडकीस आली- केशव उपाध्ये

“कोल्हापूरमध्ये शनिवारी मध्यरात्रीपासून 8 दिवसांचा कडकडीत लाॅकडाऊन जाहीर”

PSI परीक्षा उत्तीर्ण 737 उमेदवारांना ट्रेनिंगला पाठवणार- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील