Home महाराष्ट्र केंद्रावर खापर फोडण्याची राज्य सरकारची खेळीदेखील न्यायालयात उघडकीस आली- केशव उपाध्ये

केंद्रावर खापर फोडण्याची राज्य सरकारची खेळीदेखील न्यायालयात उघडकीस आली- केशव उपाध्ये

मुंबई : राज्यातील कोरोनाची स्थिती, रुग्णालयांत उपलब्ध असलेले बेड्स या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिकेवर आज सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयातून थेट बेडसाठी कोविड कंट्रोल रूमला फोन करण्यात आला आणि त्यानंतर सत्य परिस्थिती समोर आली. यावर भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

स्वताच स्वताच्या कौतुकाची टीमकी वाजवत त्यातच मश्यगुल असणाऱ्या ठाकरे सरकारचे वाभाडे आज न्यायालयाने काढले. जनहितापेक्षा स्वकौतुकासह बेछूट व बेजबाबदार विधान करण्याची सवय असलेल्या राज्यसरकारने तिथेही न्यायालयाची दिशाभूल करत वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला पण थेट फोनच..लावायला सांगत तोही उघडा पडला. या खरडपट्टी नंतर सरकार भानावर येऊन काही जनहिताचे निर्णय घेईल का? हा खरा प्रश्न आहे. सुनावणीदरम्यान मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांनी राज्यातील रेमडेसीवीर व रुग्णालयांतील खाटांच्या व्यवस्थापनातील ढिसाळपणाबद्दल सरकारविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली, असं केशव उपाध्ये म्हणाले.

एकीकडे राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे राज्य सरकार सांगते आणि रेमडेसीवीरची मागणी मात्र कायम ठेवते याबद्दल तीव्र आश्चर्य व्यक्त करून न्यायालयाने सरकारला धारेवर धरले. रेमडेसीवीरची गरज असलेल्या रुग्णास रुग्णालयातूनच ते मिळाले पाहिजे हे पाहण्याची जबाबदारी राज्य सरकारची असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले असताना हे आदेशधाब्यावर बसवून रुग्णांनाच रेमडेसीवीरसाठी पायपीट करावी लागतेयाबद्दलही न्यायालयाने नाराजी व्यक्तकेली. खाटांच्या उपलब्धतेबद्दलचा सरकारचा दावादेखील फोलअसल्याचे न्यायालयातचस्पष्ट झाल्याने राज्य सरकारची चांगलीच पंचाईत झाली, असा टोला केशव उपाध्येंनी यावेळी लगावला.

महत्वाच्या घडामोडी –

“कोल्हापूरमध्ये शनिवारी मध्यरात्रीपासून 8 दिवसांचा कडकडीत लाॅकडाऊन जाहीर”

PSI परीक्षा उत्तीर्ण 737 उमेदवारांना ट्रेनिंगला पाठवणार- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी विधानसभेच्या आमदारावर भरदिवसा गोळीबार”

राज्य सरकारच्य लसीकरण मोहीमेवरुन अतुल भातखळकरांचा मुख्यमंत्र्यांना टोला; म्हणाले…