Home महाराष्ट्र “युतीत असताना एक बोलणारे शिवसेना पक्षप्रमुख आघाडीत गेल्यावर कसे बदलले, हे आता...

“युतीत असताना एक बोलणारे शिवसेना पक्षप्रमुख आघाडीत गेल्यावर कसे बदलले, हे आता जनतेला माहीत झालं”

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना लिहिलेलं पत्र राज्यपालांकडे सुपूर्द केलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत मराठा आरक्षणावर भाष्य केलं. यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

मुख्यमंत्री महोदय, 2 मिनिटात 2 परस्पर विरोधी भूमिका कशा हो मांडता? एकतर मराठा आरक्षण कायदा ‘एकमताने केलेला व योग्य’ आहे,असं तरी म्हणा किंवा कायदा ‘टिकणारा नव्हता’ असं तरी म्हणा! युतीत असताना एक बोलणारे शिवसेना पक्षप्रमुख आघाडीत गेल्यावर कसे बदलले, हे आता जनतेला माहीत झालं आहे. , असं म्हणत दरेकरांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

महत्वाच्या घडामोडी –

…हेच का ते मुंबई माॅडेल?, ठाकरे सरकार फक्त PR जोरदार; अतुल भातखळकरांचा हल्लाबोल

“कायदा बनल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे आज म्हणतात की, कायदा ‘फुलप्रूफ’ नव्हता! किती हा दुटप्पीपणा?”

“जायचंय पंढरपूरला पण गाडी निघाली गोव्याला असा मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा आघाडी सरकारने केला”

…आता पुढचा नंबर अनिल परब यांचा लागणार; किरीट सोमय्यांचा इशारा