Home महाराष्ट्र “उत्तर प्रदेशात रामराज्य आलं आणि सरकारने लोकांना रामभरोसे सोडून दिलं”

“उत्तर प्रदेशात रामराज्य आलं आणि सरकारने लोकांना रामभरोसे सोडून दिलं”

मुंबई : बिहारमध्ये गंगा नदीच्या किनाऱ्यावर 40 ते 50 मृतदेह हे  वाहत आल्याचं समोर आलंय, यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधलाय.

माझं मूळ गाव उत्तर भारतात आहे. तेथील लोकांचे आम्हाला फोन येत आहेत. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये कोणत्याही व्यक्तीची कोरोना चाचणी होत नाही. त्याठिकाणी उपचार करण्यासाठी डॉक्टर नाहीत. एवढंच काय मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी लाकडंही शिल्लक राहिलेली नाहीत. त्यामुळे मृतदेह नदीच्या प्रवाहात सोडले जात आहेत, असं नवाब मलिक म्हणाले आहेत. ते मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

दरम्यान, अशी परिस्थिती असताना योगी सरकार टीव्हीवर जाहिराती करत आहे. उत्तर प्रदेशात रामराज्य आलं आणि सरकारने लोकांना रामभरोसे सोडून दिलं, अशी टीकाही नवाब मलिक यांनी यावेळी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“ठाकरे सरकारचे दीड वर्ष फक्त अर्णब गोस्वामी, कंगना राणावत यांच्या सोबत 2 हात करण्यात गेले”

ठाकरे सरकराचा ‘मुंबई मॉडेल’ हा निव्वळ खोटारडेपणा- नितेश राणे

“अनिल देशमुखांवर ED ने दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे राजकारण”

संज्या राऊतला अधिकार काय मराठा समाजाच्या विषयावर बोलण्याचा?; निलेश राणेंचा हल्लाबोल