Home महाराष्ट्र ठाकरे सरकराचा ‘मुंबई मॉडेल’ हा निव्वळ खोटारडेपणा- नितेश राणे

ठाकरे सरकराचा ‘मुंबई मॉडेल’ हा निव्वळ खोटारडेपणा- नितेश राणे

मुंबई : देशभरात नावाजला जात असणारा ठाकरे सरकराचा ‘मुंबई मॉडेल’ हा निव्वळ खोटारडेपणा असल्याचा आरोप भाजप आमदार नितेश राणे  यांनी केला आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णांची नोंद पुणे आणि इतर शहरांच्या खात्यात करणे, हाच ‘मुंबई मॉडेल’ आहे का? अनेक लोकांनी मला याबद्दल माहिती दिली आहे. मुंबईत एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह झाली की त्याला पुण्याच्या कोविड वॉर रुममधून फोन येतो. अशाप्रकारे ठाकरे सरकार मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा कमी भासवत आहे, असं नितेश राणे म्हणाले आहेत.

कोरोना रुग्ण मुंबईतून पुण्यात ट्रान्सफर केले जातात म्हणजे त्यांना प्रत्यक्षात एका शहरातून दुसऱ्या शहरात हलवले जात नाही. केवळ त्यांची नोंद इतर शहरांच्या कोरोना आकडेवारीत केली जाते. त्यामुळे इतर शहरांतील कोरोना रुग्णसंख्येचा आकडा हा मुंबईच्या तुलनेत जास्त राहतो, असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“अनिल देशमुखांवर ED ने दाखल केलेला गुन्हा हा मोदी सरकारच्या घाणेरड्या मनोवृत्तीचे राजकारण”

संज्या राऊतला अधिकार काय मराठा समाजाच्या विषयावर बोलण्याचा?; निलेश राणेंचा हल्लाबोल

मराठा समाजाचं ठरलं! 16 तारखेपासून पुन्हा मोर्चा काढणार; ‘या’ ठिकाणी होणार पहिला मोर्चा

“मराठा समाजाच्या भवितव्याशी खेळणं आता सरकारनं आता बंद केलं पाहिजे”