मुंबई : माझी आई स्कूल बोर्डात होती. सावित्रीबाई तिचा आदर्श. त्यामुळे माझ्यावर कमळ बघण्याचे संस्कार नाहीत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजवर निशाणा साधला आहे.
पाठ्यपुस्तक मंडळ सुरू झालं तेव्हा विज्ञानाचे आकर्षण नव्या पिढीला होईल, याची आम्ही काळजी घेतली. पण, अलिकडे पहिलीच्या मुलाला शिकवले जाते शरद कमळ बघ, छगन कमळ बघ, आणखीन काय काय कमळ बघ!, असं म्हणत शरद पवार यांनी भाजपला टोला लगावला आहे.
पाठ्यपुस्तक मंडळ सुरू झालं तेव्हा विज्ञानाचे आकर्षण नव्या पिढीला होईल, याची आम्ही काळजी घेतली. पण, अलिकडे पहिलीच्या मुलाला शिकवले जाते शरद कमळ बघ, छगन कमळ बघ, आणखीन काय काय कमळ बघ!
माझी आई स्कूल बोर्डात होती. सावित्रीबाई तिचा आदर्श. त्यामुळे माझ्यावर कमळ बघण्याचे संस्कार नाहीत. pic.twitter.com/DI2LH5VfVV— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 8, 2020
मी चार वेळा मुख्यमंत्री होतो. फाइलवर मुख्यमंत्र्यांची सही लाल शाईत असते. मंत्र्यांची निळ्या शाईत असते आणि राज्यपालांची हिरव्या शाईत. आता आम्ही हिरव्या शाईचा फारसा विचार करत नाही, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तेव्हापासून मला लाल शाईची सवय आहे आणि त्यानुसार मी या यादीत टिक केली आहे, असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर टिकास्त्र सोडलं.
महत्वाच्या घडामोडी-
…म्हणून मी दिल्लीत जाणार नाही- देवेंद्र फडणवीस
आपल्यातील भांडण विसरा आणि बाळासाहेबांचं खरं स्वप्नं जामिनीवर येऊन पूर्ण करा- अमृता ठाकरे
जसा गुन्हा तशी शिक्षा व्हावी- रुपाली चाकणकर
देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले तर महाराष्ट्राला फायदाच- एकनाथ खडसे