मुंबई : कोरोनानं देशात सगळीकडे थैमान घातलं आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या कामकाजावर कडक पावले उचलत 12 तज्ञांच्या टास्क फोर्सची राष्ट्रीय समिती स्थापन केली आहे. यावरून आता शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
कोरोना संकटाशी मुकाबला करण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याने सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय समितीची स्थापना केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने टास्क फोर्सची स्थापना करून केंद्र सरकारच्या नाकामीवर शिक्काच मारला आहे., असा टोला सामना अग्रलेखातून केंद्रावर लगावला आहे.
देशात सध्या कोरोनाचा जो हाहाकार सुरू आहे, तो पाहून सर्वोच्च न्यायालयाने पावले उचलली, पण देशाचे राज्यकर्ते राजकारणातच गुंतून पडले आहेत. आसामच्या मुख्यमंत्रीपदाचा गुंता सोडविण्यात ते मग्न होते. पश्चिम बंगालला ममता यांनी विजय मिळवला असला तरी त्यांचे राज्य त्यांना नीट चालवू द्यायचे नाही. त्यासाठीच्या कारस्थानी कारवायांत वेळ निघून जात आहे, असा हल्लाबोल सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.
दरम्यान, प्राण कंठाशी आलेल्या लोकांनी करायचे काय? त्यांचा वाली कोण? सर्वोच्च न्यायालयाचे मन द्रवले व त्यांनी कोरोना युद्धांसाठी 12 तज्ज्ञांची राष्ट्रीय समिती स्थापन केली. या समितीनेच आता कोसळलेल्या आरोग्य यंत्रणांत प्राण फुंकावा, असं म्हणत सामनातून केंद्रावर टीकास्त्र सोडलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर दरेकरांचाही ठाकरे सरकारवर निशाणा; आकडे लपवले जात असल्याचा आरोप
नुसता विरोधाला विरोध करणं चुकीचं आहे- जयंत पाटील