मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच मुंबईतील कोरोना मृत्यूची आकडेवारी लपवली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. आता प्रवीण दरेकर यांनीही यावरुन मुंबई महापालिका आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय.
RTPCR चाचण्या कमी करून संसर्ग दर कमी दाखविले जात असल्यासंदर्भात तसेच कोविड19 मुळे झालेले मृत्यू अन्य कारणांमुळे झाले असल्याची नोंद होत आहे, देवेंद्रजी फडणवीस यांनी ही अनियमितता आपल्या पत्रात तारखा, उदाहरणांसह उघड केली. त्याला मोघम उत्तर देत मुंबई महापालिकेने आणखी संशय वाढवलाय, असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
“RTPCR चाचण्या केल्यानंतर संसर्ग दर 23.43 टक्के पर्यंत कसा गेला, हे मान्य करता मग मासिक संसर्ग दर मार्चमध्ये वाढून 11.23 टक्के आणि एप्रिलमध्ये 18.06 टक्के पर्यंत गेला, ही माहिती का लपवून ठेवता? मासिक आकडेवारी देऊन दुसऱ्या लाटेत काय लपवण्याचे गौडबंगाल आहे? RTPCR चाचण्या कमी करून संसर्ग दर कमी दाखविले जात असल्यासंदर्भात तसेच #Covid19 मुळे झालेले मृत्यू अन्य कारणांमुळे झाले असल्याची नोंद होत आहे, देवेंद्रजी फडणवीस यांनी ही अनियमितता आपल्या पत्रात तारखा, उदाहरणांसह उघड केली. त्याला मोघम उत्तर देत मुंबई महापालिकेनं आणखी संशय वाढवला, असंही दरेकरांनी म्हटलंय.
विरोधी पक्ष नेत्यांनी @officeofUT ना पत्र लिहिले,त्याला मुख्यमंत्र्यांनी उत्तर देणे अपेक्षित होते.मात्र उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार @mybmc गेल्या कित्येक वर्षांपासून करते आहे, त्याचाच परिचय पुन्हा एकदा शिवसेनेने दिला आहे.
— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) May 9, 2021
महत्वाच्या घडामोडी –
नुसता विरोधाला विरोध करणं चुकीचं आहे- जयंत पाटील
“राज्य सरकारने स्वतःची पाठ थोपटत बसण्यापेक्षा आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याची आवश्यकता”
“विरोधकांनी केवळ टीका न करता लसीसाठी एखादं पत्र केंद्रालाही लिहावं”