Home महाराष्ट्र “विरोधकांनी केवळ टीका न करता लसीसाठी एखादं पत्र केंद्रालाही लिहावं”

“विरोधकांनी केवळ टीका न करता लसीसाठी एखादं पत्र केंद्रालाही लिहावं”

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तर दुसरीकडे कोरोना लसींचा तुटवडा जाणवत आहे. अशातच विरोधक राज्य सरकारवर टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पावार यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय.

“कोविडच्या लढ्याबाबत पंतप्रधान आणि सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचं कौतुक केलं, त्यामुळं राज्यातील विरोधकांनी केवळ राजकीय टीका न करता राज्याला पुरेशा लसी कशा मिळतील, यासाठी एखादं पत्र केंद्रालाही जरुर लिहावं” असं रोहित पवार म्हणाले आहेत.

“कोविडच्या मृतांची आकडेवारी लपवण्याबाबत बोलायचं तर आज हे भाजपशासित राज्यांना सांगण्याची खरी गरज आहे. कोविडचा हा लढा संपलेला नाही. त्यामुळं राजकीय टीका-टिप्पणी टाळून सर्वांनाच हा लढा एकत्रित लढावा लागणार आहे. त्यासाठी प्रयत्न करुयात!” असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

आदित्य ठाकरेंना जसं मंत्रीपद दिलंत, तसंच बहुजनांचं पालकत्व स्वीकारा; पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मोदींनी महाराष्ट्राचं कौतुक केलं, पण फडणवीस टीका करतात, मग योग्य कोण?; जयंत पाटलांचा सवाल

ऑक्सिजनवरील जीएसटी हटवा; जयंत पाटलांची अर्थ मंत्रालयाकडे मागणी

‘मराठा आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टात जावंच लागेल’, पण…; चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला सल्ला